बुलडाणा, (जिमाका) दि.9: शासनाव्दारे बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे एमएच- 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे.
खामगाव उपप्रादेशिक परिवहन विभागासंदर्भात स्थानिक वर्तमानपत्रामध्ये तसेच समाज माध्यमामध्ये MH-56 हा आरटीओ कोड ठाणे ग्रामीण विभागाचा असल्याचे गुगलसर्च केल्यावर दिसत असल्योच दिसून येत असल्याची बातमी येत आहे.
शासन निर्णय क्रमांक एमव्हीडी/0724/प्र.क्र.165/परि-4 दि. 3 ऑक्टोंबर 2024 नुसार खामगांव जि. बुलडाणा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH-56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. समाजमाध्यमवरील चुकीच्या व भ्रामक माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आली आहे