चिखलीकडे एमएच २८ बी एल ०८४६ या मोटरसायकल वरून जाणाऱ्या मोटरसायकल चालकाला रात्रीच्या अंधारात रोडवर उभी असलेली बस न दिसल्यामुळे ती मोटर सायकल गाडीवर धडकली. या भीषण धडकेमध्ये मोटरसायकल वरील गोपाल पंढरीनाथ सुरडकर (राहणार बेराळा वय वर्ष २०), धनंजय प्रमोद ठेंग (राहणार वाघापूर वय वर्ष १६), सुनील सुभाष सोनवणे (राहणार रायपूर हल्ली मुक्काम खडकपुरा चिखली वय वर्ष ३५) हे तिघेजण जागीच ठार झाले.
मेहकरवरून दुपारी दोन वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम एच ०६ ए एस ८८१६ ही मेहकरवरून परत येताना या मार्गावरील वरदाड फाट्याजवळ बंद पडली. म्हणून एसटी बस तिथेच उभी करण्यात आली. असे असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सोलर फिटिंगचे काम करून मेहकरवरून चिखलीकडे एमएच २८ बी एल ०८४६ या मोटरसायकल वरून जाणाऱ्या मोटरसायकल चालकाला रात्रीच्या अंधारात रोडवर उभी असलेली बस न दिसल्यामुळे ती मोटर सायकल गाडीवर धडकली.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना चिखली सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेने संदर्भात अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कडूबा डोईफोडे यांनी चिखली ग्रामीण रुग्णालयात येऊन माहिती मिळताच पंचनामा केले. घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी कडूबा डोईफोडे करीत आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल झाला नव्हता.
जिल्ह्यातून जाणारा समृद्धी मार्गावरचे रस्त्यावरील अपघाताचे सत्र थांबायचे नाव न घेत नाहीये, त्यातच आता अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर देखील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकंदरीत दिवसेंदिवस रस्ते गुळगुळीत होत चालले आहेत.